शब्दात व्यक्त होतो
बेभान लाट होते
वारा अनर्थ करतो
2.एक संध्याकाळ अशी....,
सरता-सरता थांबलेली
पुन्हा येईल का..? अशी ती,
प्रश्नावर अडून ह्या राहिलेली
3.जगात माझ्या मीच वेगळा मला वाटतो
इथे न कोणी माणुस साधा बाकी आहे,
तुझ्या वेदना निघून गेल्या खूप दूरवर
घाव नवे अन, खोटी आशा बाकी आहे
4.कुणास जमतो-कुणास न जमतो,
अभिनय येथे परी करावाच लागतो
दुःखात हसून डोळे हळूच पुसून,
नाट्यमय देखावा उभारावाच लागतो
5.कोणाच्या मुद्द्यांशी लोळण घेत
विचारांच्या पुंजक्यांशी भाडतांना
सळसळणारे जीवनं धमन्यांतून वाहत
दिसेल नावीन्याचा प्रवास करतांना
6.तुझ्या सारखी माणसे
फाटक्या दु:खाला
घालतात टाके, मायेने, उपजत तीक्ष्णतेने
उध्वस्थ मनात
वसवतात मैफिली आपल्या हिरव्या हाताने
7. मनाची भिंगरी
देहाला भोवळ
कशाच आन्हिक
कशाच सोवळ
8.उत्तर देण्याइतके नसते भान मला,
मी तिलाच केवळ पाहत बसतो,
बऱ्याचशा माझ्या कवितांचा
जन्माचा क्षण असाच असतो !!
Chhan ahe...
ReplyDelete